तुमसर-मोहाडीमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती! विश्वास जुना, नवी घडी-नवा वेळ

 नागपूर, 14 नवंबर: भंडारा जिल्हा तलावांनी समृद्ध जिल्हा आहे. तलावांमुळे धान शेतीसाठी जिल्हा राज्यात आपले नेतृत्व बजावतो आहे. जिल्ह्यातील तुमसर हे तर देशाला मिळालेली देणच... तांदळाचे गोदाम असलेले हे शहर येथील स्वयंपूर्ण बाजारपेठेसाठी देशात प्रसिद्ध आहे. व्यापारीकदृष्ट्या तुमसरला उत्तम वाव मिळाला असला तरी तुमसर-मोहाडी हा मतदारसंघ म्हणून विकासासाठी या क्षेत्राला दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. ‘काटछाट’चे राजकारण आणि ‘खुर्चीचा मोह’ यामुळे जिल्ह्याएवढे महत्व अधोरेखित करणाऱ्या या क्षेत्राच्या वाट्याला उपेक्षाच आली. सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून विकासाच्या खोटे आश्वासन अनेक वर्ष माथी मारले गेले. स्वार्थाच्या राजकारणाला कंटाळलेल्या आणि खोट्या आश्वासनांचे शोषक ठरलेल्या तुमसर-मोहाडी वासीयांसाठी कुणी नेता म्हणून आपले नेतृत्व करावे, ही कल्पनाच अत्यंत चीड आणणारी होती. त्यामुळेच जनतेनेच संकल्प केला आणि कुणी नेता नव्हे तर त्यांच्यातला सर्वसामान्य माणूस नेतृत्व हवा यासाठी पुढाकार घेतला. तुमसर-मोहाडीच्या जनतेला यात राजू कारेमोरे यांच्या निमित्ताने यशही आले. तुमसर-मोहाडीचे पाच वर्ष नेतृत्व करायचे, त्यात सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला आणि जमिनीशी जुळलेले नेतृत्व म्हणून कारेमोरेंकडून अपेक्षांची गर्दीच होती. पण विधानभवनात आमदार म्हणून वावरणाऱ्या कारेमारेंनी जनतेत मात्र हक्काचा राजूभाऊ म्हणून आपली छाप सोडली. जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असणे, जनतेच्या अडचणीसाठी धावून जाणे, पुर परिस्थितीत मिळेल त्या साधनाने पोहोचून जनतेला धीर देणे या माणूसपणाची जाणीव समृद्ध करणाऱ्या कृतींनी राजू कारेमोरेंची छवी जनतेच्या मनात पक्की केली. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आता प्रचाराच्या तोफा कडाडणार आणि आरोप प्रत्यारोपांचे राजकारणही पेट घेणार. अशा स्थितीत राजू कारेमोरेंच्या रणनीतीकडे अनेकांचे लक्ष आहे. प्रत्यक्ष जनतेत वावरून जनतेशी थेट संपर्क असल्यामुळे भोंग्यातल्या प्रचारापेक्षा कारेमोरेंच्या थेट मनाच्या ऋणानुबंधाचा प्रभाव भारी असणार हे जाणकार सांगतात. आमदार म्हणून राजू कारेमोरे यांच्या कार्याकडे नजर फिरवल्यास आरोग्य, रस्ते-पूल, शिक्षण, आदिवासींचा विकास आणि प्रशासकीय यंत्रणांचे बळकटीकरण अशी अनेक कामे अधोरेखित होतात. तुमसरमध्ये उपजिल्हा रुग्णालय असल्यामुळे तालुक्यातील आणि इतर भागातीलही रुग्णांचा भार येथे असतो. त्यामुळे येथे खाटांची संख्या वाढविली जावी, यासाठी अनेकदा मागणी झाली. हीच मागणी हेरून राजूभाऊ कारेमोरे यांनी तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांचा विस्तार करण्यासाठी रुग्णालयातील बेड्सची संख्या १०० बेड्सवरून २०० बेड्सवर नेली आणि रुग्णालयाची इमारत सुसज्ज करण्यासाठी २०० कोटी रुपये राज्य सरकारकडून मंजूर केले आहेत. मोहाडीच्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून त्यासाठी सुद्धा राजूभाऊंनी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. वरठी येथे ग्रामीण रुग्णालयाची मान्यता मिळवण्यात यशस्वी झालेल्या राजूभाऊंनी यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. कोरोना काळात राजूभाऊंनी केलेल्या व्यवस्थापनामुळे तुमसर-मोहाडीमध्ये ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता जाणवली नाही. घरोघरी रेशन कीट, सिलेंडर आणि भाजीपालाही त्यांनी वितरित केला, ज्यामुळे लोकांना खूप मोठा आधार मिळाला. राजूभाऊंनी तुमसर मोहाडी मतदारसंघातील ५१ पेक्षा जास्त गावांमध्ये मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. या शिबिरांमधून अनेक रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी आणि पुढील उपचार सुद्धा मोफत केले. भविष्यात तुमसर-मोहाडी मतदारसंघात दोन उपजिल्हा रुग्णालये आणि पाचपेक्षा अधिक ग्रामीण रुग्णालये स्थापन करणे, याशिवाय मतदारसंघात ब्लड बँक आणण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प सुद्धा राजूभाऊ कारेमोरे यांनी हाती घेतला आहे.रस्ते हे विकासाचा आत्मा आहे असं म्हणतात. उत्तम रस्ते हेच स्थानिक विकासाला गती देण्यात महत्वाची भूमिका बजावतात. ही बाब हेरून आमदार राजू कारेमोरे यांनी तुमसर-मोहाडी मतदार संघातील रस्त्यांचे काम हाती घेतले. वरठी मधील राज्य मार्ग ३५५ क चे चौपदरीकरण करून तिथे सिमेंट रस्ता बांधला या कामासाठी १९ कोटी रुपयांचा निधीही राज्य सरकारकडून मंजूर करून घेतला. मोहाडी तालुक्यातील नवीन ढिवरखाडा, मुंढरी निलज देवाडा रस्त्याची १ कोटी रुपयांच्या निधीतून सुधारणा केली. तालुक्यातील करडी, मुंढरीतील अत्यंत बिकट परिस्थितील रस्ते सुधारण्यासाठी ४ कोटीचा निधी आणला. देव्हाडा, करडी, साकोली या राज्य मार्गाच्या सुधारणेसाठी देखील १ कोटी रुपये आणले. रोहा मुंढरी रस्त्यावरील सुर नदीवर पूलाअभावी अनेकांचे हाल होत असल्याने यासाठी प्राधान्याने लक्ष देऊन ८० कोटीचा निधी या पुलासाठी खेचून आणला. नाकाडोंगरी जवळील बावनथळी नदीवर नवीन पुलाच्या बांधकामासाठी तब्बल १०० कोटीचा निधी राजू कारेमोरे घेऊन आले. यापुढे जाऊन रामटेक ते गोंदिया राज्य मार्गाच्या बांधकामासाठी शंभर, दोनशे नव्हे एक हजार कोटीचा निधी राज्य मंत्रीमंडळातून मंजूर करून आणीत आपल्या राजकीय चातुर्याची चुणूक दाखवली. त्याच राजकीय चातुर्यातून जांब देव्हाडी रस्त्याचे ५०० कोटीच्या निधीमधून बांधकाम होत आहे.मुलभूत सुविधांच्या बळकटीकरणासोबतच शैक्षणिक क्षेत्रात आमदार राजू कारेमोरेंचे कार्य लक्षवेधक आहेत. १५ कोटी रुपयांचा निधी तुमसर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी वस्तीगृहासाठी तर तुमसर येथे आदिवासी निवासी वस्तीगृहासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. आदिवासी बांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध कामांची आखणी करून १० कोटी रुपयांचा निधीही त्यांनी मंजूर केला. सर्वसामान्य जनतेचा नियमित संपर्क येतो तो प्रशासनासोबत... तुमसर मतदार संघातील तुमसर आणि मोहाडी या दोन्ही तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी येथील मुलभूत सुविधांची घडी सुधारण्याची गरज आमदार राजू कारेमोरे यांनी ओळखली. त्यातूनच त्यांनी तुमसर आणि मोहाडीच्या तहसील कार्यालयासाठी नवीन प्रशस्त इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी १० कोट

Nov 14, 2024 - 21:12
 0
तुमसर-मोहाडीमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती! विश्वास जुना, नवी घडी-नवा वेळ
तुमसर-मोहाडीमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती! विश्वास जुना, नवी घडी-नवा वेळ

 

नागपूर, 14 नवंबर: भंडारा जिल्हा तलावांनी समृद्ध जिल्हा आहे. तलावांमुळे धान शेतीसाठी जिल्हा राज्यात आपले नेतृत्व बजावतो आहे. जिल्ह्यातील तुमसर हे तर देशाला मिळालेली देणच... तांदळाचे गोदाम असलेले हे शहर येथील स्वयंपूर्ण बाजारपेठेसाठी देशात प्रसिद्ध आहे. व्यापारीकदृष्ट्या तुमसरला उत्तम वाव मिळाला असला तरी तुमसर-मोहाडी हा मतदारसंघ म्हणून विकासासाठी या क्षेत्राला दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. ‘काटछाट’चे राजकारण आणि ‘खुर्चीचा मोह’ यामुळे जिल्ह्याएवढे महत्व अधोरेखित करणाऱ्या या क्षेत्राच्या वाट्याला उपेक्षाच आली. 

सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून विकासाच्या खोटे आश्वासन अनेक वर्ष माथी मारले गेले. स्वार्थाच्या राजकारणाला कंटाळलेल्या आणि खोट्या आश्वासनांचे शोषक ठरलेल्या तुमसर-मोहाडी वासीयांसाठी कुणी नेता म्हणून आपले नेतृत्व करावे, ही कल्पनाच अत्यंत चीड आणणारी होती. त्यामुळेच जनतेनेच संकल्प केला आणि कुणी नेता नव्हे तर त्यांच्यातला सर्वसामान्य माणूस नेतृत्व हवा यासाठी पुढाकार घेतला. तुमसर-मोहाडीच्या जनतेला यात राजू कारेमोरे यांच्या निमित्ताने यशही आले. तुमसर-मोहाडीचे पाच वर्ष नेतृत्व करायचे, त्यात सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला आणि जमिनीशी जुळलेले नेतृत्व म्हणून कारेमोरेंकडून अपेक्षांची गर्दीच होती. पण विधानभवनात आमदार म्हणून वावरणाऱ्या कारेमारेंनी जनतेत मात्र हक्काचा राजूभाऊ म्हणून आपली छाप सोडली. जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असणे, जनतेच्या अडचणीसाठी धावून जाणे, पुर परिस्थितीत मिळेल त्या साधनाने पोहोचून जनतेला धीर देणे या माणूसपणाची जाणीव समृद्ध करणाऱ्या कृतींनी राजू कारेमोरेंची छवी जनतेच्या मनात पक्की केली. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आता प्रचाराच्या तोफा कडाडणार आणि आरोप प्रत्यारोपांचे राजकारणही पेट घेणार. अशा स्थितीत राजू कारेमोरेंच्या रणनीतीकडे अनेकांचे लक्ष आहे. प्रत्यक्ष जनतेत वावरून जनतेशी थेट संपर्क असल्यामुळे भोंग्यातल्या प्रचारापेक्षा कारेमोरेंच्या थेट मनाच्या ऋणानुबंधाचा प्रभाव भारी असणार हे जाणकार सांगतात. आमदार म्हणून राजू कारेमोरे यांच्या कार्याकडे नजर फिरवल्यास आरोग्य, रस्ते-पूल, शिक्षण, आदिवासींचा विकास आणि प्रशासकीय यंत्रणांचे बळकटीकरण अशी अनेक कामे अधोरेखित होतात. तुमसरमध्ये उपजिल्हा रुग्णालय असल्यामुळे तालुक्यातील आणि इतर भागातीलही रुग्णांचा भार येथे असतो. त्यामुळे येथे खाटांची संख्या वाढविली जावी, यासाठी अनेकदा मागणी झाली. हीच मागणी हेरून राजूभाऊ कारेमोरे यांनी तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांचा विस्तार करण्यासाठी रुग्णालयातील बेड्सची संख्या १०० बेड्सवरून २०० बेड्सवर नेली आणि रुग्णालयाची इमारत सुसज्ज करण्यासाठी २०० कोटी रुपये राज्य सरकारकडून मंजूर केले आहेत. मोहाडीच्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून त्यासाठी सुद्धा राजूभाऊंनी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. वरठी येथे ग्रामीण रुग्णालयाची मान्यता मिळवण्यात यशस्वी झालेल्या राजूभाऊंनी यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. कोरोना काळात राजूभाऊंनी केलेल्या व्यवस्थापनामुळे तुमसर-मोहाडीमध्ये ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता जाणवली नाही. घरोघरी रेशन कीट, सिलेंडर आणि भाजीपालाही त्यांनी वितरित केला, ज्यामुळे लोकांना खूप मोठा आधार मिळाला. राजूभाऊंनी तुमसर मोहाडी मतदारसंघातील ५१ पेक्षा जास्त गावांमध्ये मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. या शिबिरांमधून अनेक रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी आणि पुढील उपचार सुद्धा मोफत केले. भविष्यात तुमसर-मोहाडी मतदारसंघात दोन उपजिल्हा रुग्णालये आणि पाचपेक्षा अधिक ग्रामीण रुग्णालये स्थापन करणे, याशिवाय मतदारसंघात ब्लड बँक आणण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प सुद्धा राजूभाऊ कारेमोरे यांनी हाती घेतला आहे.

रस्ते हे विकासाचा आत्मा आहे असं म्हणतात. उत्तम रस्ते हेच स्थानिक विकासाला गती देण्यात महत्वाची भूमिका बजावतात. ही बाब हेरून आमदार राजू कारेमोरे यांनी तुमसर-मोहाडी मतदार संघातील रस्त्यांचे काम हाती घेतले. वरठी मधील राज्य मार्ग ३५५ क चे चौपदरीकरण करून तिथे सिमेंट रस्ता बांधला या कामासाठी १९ कोटी रुपयांचा निधीही राज्य सरकारकडून मंजूर करून घेतला. मोहाडी तालुक्यातील नवीन ढिवरखाडा, मुंढरी निलज देवाडा रस्त्याची १ कोटी रुपयांच्या निधीतून सुधारणा केली. तालुक्यातील करडी, मुंढरीतील अत्यंत बिकट परिस्थितील रस्ते सुधारण्यासाठी ४ कोटीचा निधी आणला. देव्हाडा, करडी, साकोली या राज्य मार्गाच्या सुधारणेसाठी देखील १ कोटी रुपये आणले. रोहा मुंढरी रस्त्यावरील सुर नदीवर पूलाअभावी अनेकांचे हाल होत असल्याने यासाठी प्राधान्याने लक्ष देऊन ८० कोटीचा निधी या पुलासाठी खेचून आणला. नाकाडोंगरी जवळील बावनथळी नदीवर नवीन पुलाच्या बांधकामासाठी तब्बल १०० कोटीचा निधी राजू कारेमोरे घेऊन आले. यापुढे जाऊन रामटेक ते गोंदिया राज्य मार्गाच्या बांधकामासाठी शंभर, दोनशे नव्हे एक हजार कोटीचा निधी राज्य मंत्रीमंडळातून मंजूर करून आणीत आपल्या राजकीय चातुर्याची चुणूक दाखवली. त्याच राजकीय चातुर्यातून जांब देव्हाडी रस्त्याचे ५०० कोटीच्या निधीमधून बांधकाम होत आहे.

मुलभूत सुविधांच्या बळकटीकरणासोबतच शैक्षणिक क्षेत्रात आमदार राजू कारेमोरेंचे कार्य लक्षवेधक आहेत. १५ कोटी रुपयांचा निधी तुमसर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी वस्तीगृहासाठी तर तुमसर येथे आदिवासी निवासी वस्तीगृहासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. आदिवासी बांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध कामांची आखणी करून १० कोटी रुपयांचा निधीही त्यांनी मंजूर केला. सर्वसामान्य जनतेचा नियमित संपर्क येतो तो प्रशासनासोबत... तुमसर मतदार संघातील तुमसर आणि मोहाडी या दोन्ही तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी येथील मुलभूत सुविधांची घडी सुधारण्याची गरज आमदार राजू कारेमोरे यांनी ओळखली. त्यातूनच त्यांनी तुमसर आणि मोहाडीच्या तहसील कार्यालयासाठी नवीन प्रशस्त इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी १० कोटी असा एकूण २० कोटीचा निधी मंजूर केला. तुमसरमधील पोलिस स्टेशनची इमारत देखील प्रशस्त आणि उत्तम सुविधांनी युक्त असावी यासाठी १० कोटी रुपये नवीन इमारतीसाठी आणले. जांब आणि करडी या दोन्ही ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नवीन इमारतीसाठी प्रत्येक ८ कोटी याप्रमाणे १६ कोटी रुपये आणले. 

तुमसर-मोहाडी या दुष्काळग्रत भागात राजूभाऊंनी पाण्याची सोय करून नंदनवन फुलवलं. भाऊंनी अनेक वर्षांपासून बंद असलेले सोरणा डॅम प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पामुळे अनेक गावांची शेती सिंचनाखाली आली शिवाय गावांच्या पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न सुटला. कामगारांच्या स्वावलंबनासाठी राजूभाऊंनी जीवनावश्यक वस्तूंच्या किट वितरित केल्या. कामगारांच्या मुलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण घेता यावे यासाठी या मुलांना लॅपटॉप, संगणक, मोबाईल देण्यासाठी सुद्धा राजूभाऊ कारेमोरे यांनी पुढाकार घेतला आहे. सत्कर्मांतूनच मतदारसंघाचे हित साधण्याची पवित्र भावना ठेवून राजूभाऊ कारेमोरे यांनी परमात्मायिक सेवक मंडळाला दीडशेपेक्षा जास्त सभागृह आणि सभामंडप बांधून दिले. यामुळे स्थानिक लोकांना त्यांच्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा लाभ मिळाला आहे. येणाऱ्या काळात मतदारसंघातील प्रत्येक गावात सभा मंडप बांधून देण्याचे संकल्प राजूभाऊ कारेमोरे यांनी हाती घेतले आहे. गावागावांमध्ये सर्वधर्म समभाव वाढीस लागावे, सहिष्णूता नांदावी यासाठी बुद्ध विहारांची निर्मिती करून राजूभाऊ कारेमोरे यांनी शांतीचा संदेश प्रसारित केला. 

जगाचा पोशिंदा जगला पाहिजे या हेतूने राजूभाऊ कारेमोरे यांनी शेतकऱ्याला समृद्ध बनवण्यासाठी अनेक अद्वितीय धोरणे राबवली. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी जाणाऱ्या मार्गांच्या सुधारणा करण्यावर मोठा भर दिला. शेतकऱ्यांना शेतात सहजतेने पोहोचता यावे आणि शेतीमालाच्या वाहतुकीत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांनी ५०० पाणंद रस्त्यांची मंजुरी मिळवून दिली. याशिवाय शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राजूभाऊ कारेमोरे यांनी समृद्ध शेतकरी संकल्प हाती घेऊन शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या योजना राबवल्या. २०१९ पूर्वी मतदारसंघात फक्त आठ धान्य खरेदी केंद्र असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या परिस्थितीला बदलण्यासाठी राजू कारेमोरे यांनी धान्य खरेदी केंद्रांची संख्या ८ वरून थेट १६० पर्यंत वाढविली. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री अधिक सोप्या पद्धतीने करता येत आहे. व्यापारांची मतेदारी संपुष्टात येऊन शेतकऱ्यांचे शोषण थांबले आहे. राजूभाऊ कारेमोरे यांनी डीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोनस लागू करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना केली. 

महिला सक्षमीकरणासाठी राजूभाऊ कारेमोरे यांनी महिला बचत गटांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. महिला बचत गटासाठी राजूभाऊंनी १६ ग्रामसंघ आणि प्रभागसंघ उपलब्ध करून देऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक ठोस मंच तयार केला आहे. या संघांच्या माध्यमातून महिलांना एकत्र येऊन आपले विचार, समस्या आणि शक्यतांचे ज्ञान मिळवण्याची संधी मिळत आहे. यामुळे त्यांना आर्थिक, आणि सामाजिक क्षेत्रात पुढे जाण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. या उपक्रमामुळे मतदारसंघातील महिला स्वावलंबी बनल्या, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबांचे आणि समाजाचेही आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावले आहे. राजूभाऊ कारेमोरे यांनी तुमसर-मोहाडी मतदारसंघात ३५ पेक्षा अधिक वाचनालये तयार करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. या वाचनालयांमुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे. वाचनालयांमध्ये विविध शैक्षणिक साहित्य, पुस्तके, आणि संशोधनाची साधने असलेल्या असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात प्रचंड फायदा होत आहे. येणाऱ्या काळात २०० पेक्षा अधिक अभ्यासिका बनवण्याचा संकल्प सुद्धा राजूभाऊंनी हाती घेतला आहे. समृद्ध शहर निर्माण करण्याच्या उद्देशाने राजूभाऊ कारेमोरे यांनी तुमसर आणि मोहाडी यांना सर्व बाबींमध्ये संपन्न बनवण्यासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. राजूभाऊ कारेमोरे यांनी अथक प्रयत्नातून मोहाडी शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करुन दिली. ज्यामुळे स्थानिक नागरिकांना स्वच्छ आणि विश्वसनीय पाणी मिळत आहे. यामुळे शहरातील जलस्रोतांचे व्यवस्थापन सुधारले आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा झाली. दोन्ही शहरांची गटर लाईन योजना सध्या अंतिम टप्प्यात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे शहरांमधील स्वच्छतेचे प्रमाण वाढणार असून आरोग्याच्या समस्यापासून मुक्तता मिळणार आहे. दोन्ही शहरांमध्ये रिंग रोड बनवण्याचे काम देखील भाऊंनी हाती घेतले आहे. या रिंग रोडच्या निर्मितीमुळे वाहतुकीची सोय सुधारेल, शहरांचा विकास वेगवान होईल आणि नागरिकांना दळणवळणाची योग्य सुविधा मिळण्यास मदत होईल. 

शिक्षण, आरोग्य, दळणवळण, रोजगार, शेती, सिंचन, पाणी पुरवठा, महिला सक्षमीकरण अशा सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी करतानाच जनतेच्या हक्कासाठी, त्यांच्या प्रश्नासाठी प्रसंगी प्रशासनाशी दोन हात करणारा, प्रसंगी जनतेसाठी अंगावर पोलिस घेणारा सर्वसामान्यांच्या या आमदाराने जेव्हा त्याच प्रशासनाच्या बळीकटीकरणासाठी पुढाकार घेतला तेव्हा कार्यकर्त्यांनाही धक्का बसला असावा. अशा कामांची मोठी यादी तुमसर मोहाडीतील जनतेपुढे आमदार राजू कारेमोरे यांनी ठेवली आहे. विशेष म्हणजे, जनतेने विकासाला साथ देऊन राजू कारेमोरे यांचे हात बळकट करण्यासाठी ही निवडणूक चांगलीच मनावर घेतल्याचे दिसून येत आहे. नव्या घडीसह नवा वेळ साधताना तुमसर-मोहाडीकर जुनाच विश्वास कायम ठेवणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.